Home ठळक बातम्या पोलिसांतील साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार’

पोलिसांतील साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार’

 

कल्याण दि.18 मे :

सातारा येथील कुंडल कृष्णाई या “आम्ही पुस्तकांचे देणं लागतो” हे ब्रीद वाक्य घेऊन साहित्य विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे सन २०२५ चे कथा, कविता बाल साहित्य, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले. त्यामधील कथा विभागातील कुंडल कृष्णाई हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड :मय पुरस्कार पोलिसातील कवी, कथाकार अर्जुन डोमाडे यांच्या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित “भितुर” या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.

सातारा येथे संपन्न झालेल्या कुंडल कृष्णाई प्रतिठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार शरद तांदळे यांचे शुभ हस्ते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव जगदाळे आणि सचिव सावित्री जगदाळे यांचे उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन डोमाडे यांनी त्यांच्या पहिल्याच कथा संग्रहाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार “ज्याचे श्रेय त्याला द्यावे” या भावनेतून त्यांच्या मनात साहित्याचे बीज पेरणारे गुरुवर्य कै. अरुण मैड आणि या कथासंग्रहातील कथांचे कथाबीज पुरविणारे कथेचे ज्ञात, अज्ञात नायक आणि नायिका यांना अर्पण केला आहे. तर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्जुन डोमाडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा