Home ठळक बातम्या महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी महेश तपासे

महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी महेश तपासे

 

कल्याण दि.25 जुलै :
कल्याण शहरात 1980 पासून भारत गॅस वितरण करणाऱ्या गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तपासे यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Mahesh tapase appointed as Executive President of Maharashtra Bharat Gas Distributors Association)

राष्ट्रीय भारत गॅस वितरक संघटनेचे अध्यक्ष कैलास दुधानी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महेश तपासे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला किशोर सोडा, अतुल शहा, अरुण वेटेकर, उषा पूनावाला, सरोज अहिरे आणि शिरीष वारंगे आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले.

महाराष्ट्रातील गॅसधारकांना वितरकांमार्फत उत्कृष्ट आणि जलद सेवा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महेश तपासे यांनी या नियुक्तीवर व्यक्त केली. तसेच कोविड काळात संपूर्ण लॉकडाऊन असतानाही त्यावेळी गॅसवितरकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गॅसधारकांना सिलेंडर पुरवठा केल्याची आठवणही तपासे यांनी करून दिली.

तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारतील प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत भरीव अशी कामगिरी महाराष्ट्रातील गॅस वितरकांनी केल्याबद्दल देशपातळीवरही या संघटनेचे मोठे कौतुक झाले. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी भगिनींना सरकारी धोरणानुसार गॅस वितरणचे काम वितरक बांधवांनी मोठ्या उत्साहाने केले आणि त्याचा फायदा लाखो लाडक्या भगिनींना झाल्याचेही ते म्हणाले.

त्याशिवाय गॅस पाईपलाईनमुळे गॅस सिलेंडरला आता फक्त शहरातील अविकसित भाग आणि राज्याचा ग्रामीण भाग येथेच मागणी असून परिणामी वितरक बांधवांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर आता गॅसधारकांनाही केवायसी (KYC) सोबतच सिलेंडर घेताना आपला नोंदणीकृत मोबाईलचा ओटीपी (OTP) संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे अत्यावश्यक आणि बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांनी पाच वर्षात एकदा त्यांची रबर ट्यूब बदलावी आणि कायद्याने मान्य असलेली आवश्यक तपासणी वितरकांच्या अधिकृत मेकॅनिककडून करून घ्यावी जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होईल. गॅस गळतीच्या वेळी ग्राहकांनी काय तात्काळ उपाय करावे यासाठी वेळोवेळी महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजन करणार असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा