Home ठळक बातम्या डोंबिवलीत घरगुती गॅस गळतीमुळे मध्यरात्री भीषण स्फोट; लहान मुलासह पाच जण जखमी

डोंबिवलीत घरगुती गॅस गळतीमुळे मध्यरात्री भीषण स्फोट; लहान मुलासह पाच जण जखमी

डोंबिवली, दि.20 जानेवारी :
डोंबिवली पूर्वेतील नवनीत नगर संकुलात घरगुती गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे मध्यरात्री बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. ज्यामध्ये 1 व्यक्ती गंभीर जखमी असून 4 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Midnight Blast in Dombivli Due to Domestic Gas Leak; Five Injured Including a Child)

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील नवनीत नगर संकुलातील एका इमारतीच्या 510 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये केतन देढिया हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती सुरू होती. मध्यरात्री केतन देढिया घरी परतल्यानंतर लाईट चालू करताच अचानक मोठा स्फोट झाला. ज्यामध्ये केतन देढिया गंभीर जखमी झाले असून त्यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

स्फोटाचा जोर इतका प्रचंड होता की शेजारील फ्लॅटमध्ये राहणारे मेहुल वासाड आणि विजय घोर हेदेखील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. तसेच केतन देढिया यांच्या घरातील खिडकी आणि लोखंडी ग्रील तुटून खाली कोसळले.

याच वेळी इमारतीच्या परिसरात खाली फिरत असलेले हरीश लोढाया आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा पार्श्व लढाया यांच्या अंगावर काचांचे तुकडे पडल्याने ते किरकोळ जखमी झाले. या जखमींना सोसायटीतील रहिवाशांनी तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशामक दल आणि मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा