Home ठळक बातम्या १४ गावांच्या पाणीप्रश्नी आमदार राजेश मोरे यांनी घेतली बैठक

१४ गावांच्या पाणीप्रश्नी आमदार राजेश मोरे यांनी घेतली बैठक

कल्याण ग्रामीण दि.22 एप्रिल :
कल्याण तालुक्यातील १४ गावांना भेडसावणारी पाणी टंचाई, थकीत पाणी बिले याबाबत आज आमदार राजेश मोरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, उप अभियंता प्रणिता कापरकर, प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्यासमवेत ग्रामस्थ समिती सदस्याची बैठक घेतली. कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत पाणी प्रश्न सोडविण्याबाबत उपाययोजना, थकीत बिल भरणा आणि पाणी योजना हस्तांतरित आदीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या योजनांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही आमदार राजेश मोरे यांनी यावेळी दिले.

कल्याण ग्रामीण मतदार संघात समाविष्ट असलेल्या १४ गावांना तीव्र पाणी टंचाई भेडसावत असून त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची कामे सुरु आहेत. या कामाचा आढावा घेतानाच आता तातडीने या नागरिकांना पाणी प्रश्नी कसा दिलासा देता येईल याबाबत आमदार मोरे यांनी गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशासक यांच्याशी चर्चा केली. यावेळी योजनांची माहिती देतानाच अधिकाऱ्यांनी थकीत पाणी बिलाबाबत देखील माहिती दिली. दरम्यान पाणी योजना ग्राम कमिटीकडून ग्रामपंचायतीकडे हस्तातरीत केल्या जाणार असून यापुढील वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे राहील. मात्र पूर्वीच्या वसुलीसाठी नागरिकांना व्याज माफी देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी ग्राम कमिटीला दिले आहे.

त्याचबरोबर पाणी बिलावर आकारण्यात आलेल्या व्याजावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामकमिटीला देण्यात आले.

यावेळी १४ गाव समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत भोईर, सचिव भाजपा नेते लक्ष्मण पाटील, सदस्य तसेच भंडार्लीचे माजी सरपंच धनाजी पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी डोंबिवली शहर सचिव तथा विद्यानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण , विभागप्रमुख आणि बाजार समिती सभापती भरत भोईर, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल आदी सर्व उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा