Home ठळक बातम्या “ऑपरेशन अभ्यास”: कल्याणात आज दुपारी या पद्धतीने होणार मॉकड्रिल

“ऑपरेशन अभ्यास”: कल्याणात आज दुपारी या पद्धतीने होणार मॉकड्रिल

कल्याण दि.7 मे :
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींची सज्जता तपासण्यासाठी कल्याणात आज “ऑपरेशन अभ्यास” मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजता कल्याण पश्चिमेतील मॅक्सी ग्राउंडवर हे मॉकड्रिल होणार असून त्यामध्ये पुढीलप्रमाणे सर्व घटनाक्रम असणार आहे. (“Operation Abhyas”: Mock drill to be held in Kalyan this afternoon)

या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान भारताच्या लष्कराने काल रात्री पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर आज होणाऱ्या या मॉकड्रिलला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

असा असणार त्यातील घटनाक्रम…
•कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण 4 सायरन एकाच वेळी वाजणार.

•Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार

•सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.

•धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.

•संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा