Home ठळक बातम्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि भटाळे तलाव सुशोभीकरणासाठी 50 कोटींचा निधी द्या –...

ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि भटाळे तलाव सुशोभीकरणासाठी 50 कोटींचा निधी द्या – शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांना केली विनंती

कल्याण दि.10 ऑक्टोबर :

कल्याण पश्चिमेतील शिवकालीन भटाळे तलाव आणि दुर्गाडी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येकी 50 कोटींचा निधी देण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना पत्र दिले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही याबाबत विनंती केली आहे. (Provide a fund of 50 crores for the beautification of the historic Durgadi Fort and Bhatale Lake – Shiv Sena city chief Ravi Patil demands)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श ऐतिहासिक कल्याण शहराला लाभलेला आहे. ही शहराच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब असून छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला हा कल्याण शहराचा मानबिंदू आहे. त्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरू असून किल्ल्याच्या परिसरातील आणि आजूबाजूच्या भागात सुशोभिकरण करणेही तितकेच गरजेचे आहे. याच अनुषंगाने आपण राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 50 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.

यासोबतच छत्रपतींच्या काळातीलच ऐतिहासिक भटाळे तलावाचेही पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण करून जतन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या शहराच्या ऐतिहासिक वास्तूंची आणि समृद्ध वारशाची माहिती नव्या पिढीसमोर जाऊ शकेल अशी भूमिका रवी पाटील यांनी मांडली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा