
कल्याण दि.16 जुलै :
प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान आणि नि-क्षय मित्र योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, रोटरी क्लब कल्याण रिव्हरसाईड आणि रोटरी क्लब ठाणे प्रीमियम यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयग्रस्त रुग्णांना पोषण आहाराचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. (Rotary Club of Kalyan Riverside distributes nutritious food to tuberculosis patients)
क्षयरोग (टीबी) हा एक गंभीर आणि जीवन धोकादायक आजार आहे, जो मुख्यतः पोषणाच्या कमतरतेमुळे आणि वजन कमी असण्यामुळे वाढतो. यामुळे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आणि चौरस आहार अत्यंत आवश्यक ठरतो. हे लक्षात घेऊन, रोटरी क्लब कल्याण रिव्हरसाईडने १४५ क्षयग्रस्त रुग्णांना पोषक आहार किट वितरित केले. प्रत्येक किटमध्ये गव्हाचे पीठ, विविध प्रकारच्या डाळी, सोयाबीन, खाद्यतेल यांचा समावेश करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि लवकर बरे होण्यास मदत होईल.
वाटप झालेल्या पोषण आहार किट्समध्ये सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे रुग्णांना शरीरातील कमजोरी दूर करण्यास मदत होईल. रोटरी क्लब कल्याण रिव्हरसाईडने या उपक्रमासाठी एक वर्षासाठी चालवण्याचे ठरवले असून, त्यानुसार दर महिन्याला रुग्णांना पोषण आहार वितरित केला जाणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल ३१४२ जिल्हा प्रांतपाल रो. हर्ष मकोल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मान्यवरांच्या उपस्थितीत बोलतानारो. हर्ष मकोल यांनी टीबी मुक्त भारत आणि नि-क्षय मित्र योजनेच्या उद्दीष्टांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यामध्ये सामील होऊन रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड ने समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे.
या कार्यक्रमास ३१४२ जिल्हा प्रांतपाल रो. हर्ष मकोल, रो. समीर सारंगधर, क्लब अध्यक्ष रो. महेश टिबे, सचिव रो. संजय माचवे, प्रकल्प प्रमुख रो. डॉ. अनंत इटकर. रो. डॉ अवधूत शेट्ये, रो, वैभव ठाकरे, रो. योगेश कल्हापुरे, रो. नरेश पटेल रो. डॉ. आशिष जैन, डॉ प्रशांत सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.