Home ठळक बातम्या हभप संत श्री सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचे काम लवकरच सुरू; जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार...

हभप संत श्री सावळाराम महाराज क्रीडासंकुलाचे काम लवकरच सुरू; जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या सुविधा

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण दि.28 नोव्हेंबर :
डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होत आहे. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा १ मधे इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येणार आहे. तर टप्पा २ मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने खेळाडूंसाठी मतदारसंघातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात आहेत. खासदार क्रीडा संग्राम ही स्पर्धा अल्पावधीत देशभरात गाजली. तर क्रीडा सुविधांमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा, मुंब्रा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज साहित्य असलेली क्रीडा संकुलांचा समावेश आहे. याच अंतर्गत अंबरनाथ येथे शूटिंग रेंज, क्रीडा संकुल, ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव, उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल, डोंबिवलीत क्रीडा संकुल, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर कळवा येथे ऑलिंपिक दर्जाच्या तलावाचे नूतनीकरण आणि क्रीडा संकुलात विविध सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

याच पद्धतीने आता डोंबिवली येथील ह. भ. प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या क्रीडा संकुलात संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू विविध मैदानी खेळांच्या सरावासाठी येत असतात. याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील होते. यासाठी शासनाकडे भरीव निधीची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. तर इंडोअर आणि आऊटडोर स्टेडियम उभारले जाणार आहे. या कामाची लवकरच प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्वाचा प्रकल्प साकार होत आहे. संपूर्ण कामकाज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या निधीतून करण्यात येत असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाची देखभाल व व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाकडे सोपविण्यात येणार आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. त्याचसोबत एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव, चारशे चौ.मी. डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म, तसेच सोळा हजार चौ.मी. तळघर पार्किंगची सोय निर्माण केली जाणार आहे.

या संकुलात इंडोर क्रीडा संकुलात योगा, जिमनॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नुकर, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील. त्याचबरोबर आदरातिथ्य व निवास व्यवस्था, भव्य बॅक्वेट हॉल्स, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र आणि बहुपयोगी सभागृह देखील या प्रकल्पाचा भाग आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा