
सदोष मनुष्यवधासह एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल
कल्याण दि.21मे :
कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेत 6 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विनापरवानगी टाईल्सचे काम करणाऱ्या फ्लॅटधारकाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणात त्याच्यावर सदोष मनुष्यवधासह एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. (Saptashrungi building accident; Kolsewadi police arrest flat owner for working on tiles without permission)
काल (मंगळवारी 20 मे 2025) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेच्या चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी को.ऑप. हौ. सोसायटी या जुन्या इमारतीमध्ये स्लॅब कोसळून 6 जणांना हकनाक जीव गमवावा लागला. तर सहा जण यामध्ये जखमी झाले आहेत. या इमारतीमधील 401 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणारे कृष्णा लालचंद चौरसिया यांच्याकडून विनापरवानगी त्यांच्या फ्लॅटमध्ये टाईल्सचे काम सुरू होते. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी केडीएमसी जे वॉर्ड अधिकारी,यांचे तक्रारीवरून या इमारती मधील फ्लॅट क्र. 401 चे मालक कृष्णा लालचंद चौरसिया यांच्याविरोधात कोळशेवाडी पोलिस ठाण्यात CR No-386/25 सदोष मनुष्य वधाचा BNS कलम 105, 125(अ), (ब सह MRTP ऍक्ट कलम 44 सह UDCPR चे नियम 2(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी कृष्णा चौरसिया यास ताब्यात अटक करण्यात आल्याचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी सांगितले.