Home ठळक बातम्या केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीवर शिवसेनेच्या रवी पाटील यांची हरकत; अन्याय दूर...

केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीवर शिवसेनेच्या रवी पाटील यांची हरकत; अन्याय दूर न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

कल्याण दि.15 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. मात्र या आरक्षण प्रक्रियेवर आता शिवसेनेने (शिंदे गट) हरकत घेतली आहे. कल्याण पश्चिम शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. (Shiv Sena’s Ravi Patil Objects to KDMC Municipal Election Reservation Lottery; Warns of Moving Court if ‘Injustice’ Not Addressed)

शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 3, 5 आणि प्रभाग क्रमांक 15 वर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. प्रभाग क्रमांक ३, ५ आणि १५ मधील आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत या तिन्ही प्रभागांमध्ये आरक्षणाची रचना समाजातील सर्व घटकांना न्याय देणारी नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रभाग क्र. ३, ५ आणि १५ मध्ये आरक्षणाचे वितरण SC, ST, OBC आणि सर्वसाधारण घटकांमध्ये पुरेशा प्रमाणात न्याय देणारे नसून त्यात अनुचित असमानता आढळत असल्याचा पाटील यांचा आरोप आहे. सर्व प्रभागांमध्ये आरक्षणाचे योग्य संतुलन न राखल्याने काही घटकांना प्रतिनिधत्व मिळणार नाही असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

या संदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे आरक्षणातील त्रुटी दूर करून सर्व समाजघटकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

तसेच यासंदर्भात आरक्षणातील पुनर्विलोकन करून असमानता तातडीने दूर करण्याची मागणी करत तसे न झाल्यास याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या असे आहे प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मधील आरक्षण…

प्रभाग क्रमांक 3 : अ-  अनु. जाती      ब-  अनु . जमाती महिलांसाठी  क- नागरिकांचा मागास प्रवर्ग   ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5 : अ- अनु .जाती       ब- अनु. जमाती   क- नागरिकांचा मागास प्रवर्ग   ड – सर्वसाधारण महिला 

प्रभाग क्रमांक 15 : अ- अनु . जाती महिला      ब-अनु . जमाती महिला    क-  नागरिकांचा मागास प्रवर्ग  ड – सर्वसाधारण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा