Home ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्य फाऊंडेशनच्या महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजारांहून अधिक...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्य फाऊंडेशनच्या महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2 हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध

येत्या काळात महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा राबवण्याची घोषणा

कल्याण दि.24 मे :
राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हा, लक्ष्य फाऊंडेशन, कल्पवृक्ष आणि इक्विटॉसच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वमध्ये आयोजित महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. येथील मॉडेल इंग्लिश शाळेमध्ये झालेल्या या महारोजगार मेळाव्यात 100 हून अधिक कंपन्यांनी तब्बल 2 हजारांपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. (Spontaneous response to the Maharojgar Mela of NCP and Lakshya Foundation; More than 2 thousand job opportunities available)

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चार विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच यापुढील काळात महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी दिली. तसेच भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोलर एनर्जी या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून तरुणांनी केवळ नोकरीपुरता मर्यादित न राहता स्टार्ट अप सुरू करून इतराना रोजगार देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर कल्याण पूर्वेत आयोजित या महारोजगार मेळाव्यात आयटी, फिनटेक, मायक्रो फायनान्स, बँकिंग, सर्व्हिस अशा मोठमोठ्या क्षेत्रातील नामांकित कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आणि आयोजक विक्रांत जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा