Home क्राइम वॉच केडीएमसी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे; लाचप्रकरणी एकाच दिवशी तिघे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

केडीएमसी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे; लाचप्रकरणी एकाच दिवशी तिघे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

कल्याण डोंबिवली दि.24 जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातील आजचा दिवस हा बहुधा काळा दिवस समजला जाईल. कारण महापालिका प्रशासनातील तिघा अधिकाऱ्यांना लाचेच्या विविध प्रकरणात एकाच दिवशी अँटी करपप्शनने पकडले आहे. अद्याप या तिघांची नावे आणि लाच घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या प्रकारामुळे केडीएमसी प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. (The reputation of KDMC administration is in tatters; Three officials in the anti-corruption net on the same day in a bribery case)

केडीएमसीतील विविध विभागात कार्यरत या तिघाही जणांना लाचेच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात अँटी करपप्शन विभागाने पकडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत आणि नेमकी माहिती समजू शकलेली नाहीये. मात्र एकाच दिवशी अशा प्रकारे तिघा अधिकाऱ्यांना अँटी करपप्शनने पकडल्याची ही पहिलीच वेळ आहे.

केडीएमसीचा इतिहास पाहिला तर महापालिका प्रशासन आणि अँटी करपप्शन यांचे खूपच जुने आणि नकारात्मकतेमध्ये अतिशय जवळचे नाते दिसून येते. गेली 40 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 46 अधिकारी आणि कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका यापूर्वीपासूनच अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारासाठी कुप्रसिद्ध असणारी ही महापालिका या नकोशा प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तर सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्याद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये या लाचखोरीच्या प्रकरणाने नकोसा आदर्श घातला गेला आहे.

(अधिकाऱ्यांची नावे आणि लाच घेतल्याची माहिती अधिकृतपणे समोर आल्यानंतर त्वरित उपलब्ध करून दिली जाईल)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा