
कल्याण दि.24 ऑक्टोबर :
येत्या मंगळवारी कल्याण पूर्व पश्चिमेसह विविध भागांचा पाणीपुरवठा तब्बल 9 तास बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटर चॅनेल येथील गाळ काढण्यासह विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी येत्या मंगळवारी 28 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील भागांच्या पाणीपुरवठा 9 तास बंद राहणार आहे. (Water supply to remain shut for 9 hours in Kalyan East and West on Tuesday (October 28, 2025)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावी आणि मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पश्चिम कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण विभागातील वडवली शहाड आणि टिटवाळा गाव परिसरात होणारा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तो साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
























