Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीच्या या भागांचा पाणी पुरवठा राहणार...

येत्या मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीच्या या भागांचा पाणी पुरवठा राहणार 7 तास बंद

 

कल्याण डोंबिवली दि.15 ऑगस्ट :

येत्या मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीच्या या भागांचा पाणी पुरवठा 7 तास बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज.शु.के.) आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील NRC-२ फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी येत्या मंगळवारी १९ ऑगस्ट २०२५ रोजी कल्याण डोंबिवलीच्या पुढील भागांमध्ये सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. यादिवशी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून महापालिकेला पाणीपुरवठा करता येणार नाही.

या भागांमध्ये पाणी पुरवठा राहणार बंद…

परिणामी महानगरपालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामीण विभागातील मांडा- टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे, “ब” प्रभाग क्षेत्रातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसर आणि डोंबिवलीच्या पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा