
कल्याण दि.14 मे :
कल्याण आणि भिवंडीतील नामांकित “गुरुकुल सायन्स क्लासेसने 10 वीच्या यंदाच्या परीक्षेतही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालामध्ये या क्लासच्या 9 विद्यार्थ्यांनी 92 टक्क्यांहून अधिक तर 18 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. (Kalyan – Bhiwandis Renowned Gurukul Science Classes achieve excellent results in 10th exam)
या उत्कृष्ट निकालाबद्दल गुरुकुल क्लासेसचे सीईओ वैभव ठाकरे आणि संचालिका भाग्यश्री ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच या यशामागे गुरुकुल टीमची दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्रामध्ये देत असलेली अमूल्य सेवा यांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच ही 24 वर्षाची यशाची परंपरा आणि यापुढेही अशीच कायम सुरू ठेवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…