Home ठळक बातम्या दहावीच्या परीक्षेत भाजी विक्रेत्याच्या मुलीने मिळवले 89 टक्के गुण

दहावीच्या परीक्षेत भाजी विक्रेत्याच्या मुलीने मिळवले 89 टक्के गुण

 

कल्याण दि.14 मे :
एकीकडे पूर्वाश्रमीच्या कचरावेचक कुटुंबातील मुलांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असताना दुसरीकडे कल्याणातील एका भाजी विक्रेत्याच्या मुलीनेही दहावी परीक्षेत तब्बल 89 टक्के गुण प्राप्त केले आहेत. अलिझा सप्पू पठाण असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या यशाबद्दल सगळीकडून कौतुक केले जात आहे. (Vegetable seller’s daughter scores 89 percent in 10th exam)

अलिझाचे वडील हे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटेच्या सुमारास भाजी विक्रीचे काम करतात. पठाण कुटुंबामध्ये 3 बहिणी असून अलिझा ही त्यातील सर्वात मोठी असून घरगुती शिकवणीच्या माध्यमातून तिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 88.60 टक्के गुण मिळवले आहेत.

दहावीच्या परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल अलीझाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा