
कल्याण दि.5 जुलै :
उद्या असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त कल्याणातील नूतन विद्यालतर्फे पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये प्लॅस्टिकमुक्ती तसेच वृक्षतोड या विषयांवर जनजागृती करण्यात आली.(Nutan Vidyalaya in Kalyan organizes eco-friendly Dindi on the occasion of Ashadhi Ekadashi)
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून विठू माऊलीला अश्रू अनावर झाले आणि विठू माऊलीच्या डोळ्यात दिसून आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम,अभंग, पालकांचा उत्साह वाढवणारा सहभाग, विविध वारकरी संप्रदायातील संत परंपरा जपणारे महानुभव यांची भूमिका साकारणारे बालकलाकार दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पूर्व प्राथमिक विभागापासून माध्यमिक विभागापर्यंत सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग तसेच परिसरातील सुजाण नागरिकांनी या दिंडीत सहभाग घेतला.
विठुरायाच्या जयघोषामध्ये ही पर्यावरण दिंडी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊन पोहोचली. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक तसेच पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दिपाली साबळे यांनी विठ्ठल रखुमाई पूजन तसेच पालखी पूजनही केले. विठूरायाच्या जयघोषात हे सर्व भक्त तल्लीन झाले होते अशी माहिती शाळेतील शिक्षिका शुभांगी भोसले यांनी दिली.