Home ठळक बातम्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य सीएंच्या हाती- केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे गौरवोद्गार

देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य सीएंच्या हाती- केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे गौरवोद्गार

आयसीएआय कल्याण डोंबिवलीतर्फे डायरेक्ट टॅक्स कॉन्फरन्सचे आयोजन

कल्याण दि.11 ऑगस्ट :
आर्थिक क्षेत्रासह देशात सुरू असणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये चार्टड अकाउंटंट (सीए) आज कार्यरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य त्यांच्या हातात असल्याची प्रशंसा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटसच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे आयोजित डायरेक्ट टॅक्स विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशातील सीएंबाबत हे गौरवोद्गार काढले. (The future of the country’s economy is in the hands of CAs – KDMC Commissioner Abhinav Goyal)

जागतिक अर्थव्यवस्थेत आपला भारत देश आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गतीने पुढे नेण्यामध्ये इथले उद्योजक आणि व्यापारी वर्ग आज काम करताना दिसत आहे. त्यांच्यासोबतच कर संकलन करण्यामागे देशातील सीए वर्गही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कारण देशाचे कर संकलन जितके चांगले होईल तितकीच देशाची आर्थिक प्रगतीही होणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडत या डायरेक्ट टॅक्स परिषदेचे त्यांनी स्वागत केले. आणि कल्याणातील आयसीए भवनचा प्रश्न महापालिका प्रशासनाकडून लवकरच सोडवला जाईल आणि आपल्याला येत्या काळात हे आयसीए भवन पाहायला मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

तर देशाच्या चांगल्या टॅक्स पॉलीसीमुळे देशभरात उद्योगस्नेही धोरण राबविण्याच्या क्रमवारीत मोठी सुधारणा होत असल्याचे मत डायरेक्ट टॅक्स कमिटीचे अध्यक्ष पियूष छाजेड आणि उपाध्यक्ष विष्णू अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केले. कल्याणातील आयसीए भवन हे आमच्या सर्वांचे स्वप्न असून हे भवन झाल्यास आमच्या हजारो सदस्यांना शैक्षणिक दृष्टीने त्याचा मोठा फायदा होईल अशी विनंती आयसीए कल्याण डोंबिवली शाखेचे अध्यक्ष राकेश अग्रवाल यांनी केली.

दरम्यान 7 आणि 8 ऑगस्ट अशी दोन दिवस चाललेल्या या परिषदेत कर क्षेत्रातील नामांकित तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले.

ही दोन दिवसीय परिषद यशस्वी करण्यासाठी कल्याण डोंबिवली ब्रँच अध्यक्ष सीए राकेश अग्रवाल, उपाध्यक्ष सीए अमित मोहरे, सचिव सी ए प्रदीप मेहता, खजिनदार सीए विपुल शहा, समिती सदस्य सी ए अनुराग गुप्ता, सी ए रोहन पाठक, सी ए ईश्वर रोहरा, सी ए गिरीश थारवानी, सीए अमृता जोशी, माजी अध्यक्ष सीए मदन आचवल, सीए शेखर पटवर्धन, सीए सौरभ मराठे, सीए अंकित अग्रवाल, सीए जितू रामलिखियानी, सीए पराग प्रभुदेसाई, सीए कौशिक गडा, सीए मयुर जैन, वरिष्ठ सीए सुहास आंबेकर, यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा