Home ठळक बातम्या भाजपकडून निवडणूक तयारीला वेग; कपिल पाटील ठाणे ग्रामीणचे निवडणूकप्रमुख तर नाना सूर्यवंशी...

भाजपकडून निवडणूक तयारीला वेग; कपिल पाटील ठाणे ग्रामीणचे निवडणूकप्रमुख तर नाना सूर्यवंशी कल्याण जिल्ह्याचे…गणेश नाईक ठाणे जिल्हा प्रभारी

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जाहीर केल्या नियुक्त्या

कल्याण दि. 5 नोव्हेंबर :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवरील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली आहे. (BJP accelerates election preparations; Kapil Patil is the election chief of Thane Rural while Nana Suryavanshi is the election chief of Kalyan district… Ganesh Naik is the Thane district in-charge)

या नियुक्त्यांनुसार माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांची कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नेते मंत्री गणेश नाईक यांच्याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारीपद सोपवण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून भाजपने या पार्श्वभूमीवर संघटनात्मक स्तरावर व्यापक तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्यांमुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिसरात निवडणुकीतील पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा