Home ठळक बातम्या कल्याण-डोंबिवलीत “या दिवशी” पाणीपुरवठा राहणार १२ तास बंद

कल्याण-डोंबिवलीत “या दिवशी” पाणीपुरवठा राहणार १२ तास बंद

कल्याण डोंबिवली | २९ मे :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत येत्या मंगळवार दि. ०२ जून २०२६ रोजी तब्बल १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. (12-Hour Water Supply Shutdown in Kalyan-Dombivli on This Day)

भारतीय हवामान खात्याने यंदा अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येत्या मंगळवारी बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणी पुरवठा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरावर याचा परिणाम होणार आहे.

दरम्यान महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळा उशिरा सुरू होण्याच्या अंदाजामुळे पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा