Home ठळक बातम्या डोंबिवली-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचे एक पाऊल पुढे; महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याच्या...

डोंबिवली-ठाणे रेल्वे समांतर रस्त्याचे एक पाऊल पुढे; महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याच्या केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

मतदारसंघातील विकासकामांबाबत आमदार राजेश मोरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

कल्याण दि.31 जुलै :
डोंबिवलीहून थेट ठाण्याला जोडणाऱ्या रेल्वे समांतर रस्त्याचे एक पाऊल पुढे पडले आहे. या महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विविध विकासकामांप्रश्नी आज आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बैठकीत डोंबिवली ते ठाणे समांतर रस्त्याच्या महत्त्वाच्या विषय आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित केल्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी हे निर्देश दिले. (Dombivli-Thane railway parallel road one step ahead; KDMC Commissioner directs to start survey for ambitious road)

लोकलमध्ये वाढलेली जीवघेणी गर्दी, रेल्वेतून प्रवास करताना प्रवासी पडून होणारे अपघात यावर उपाययोजन म्हणून काही वर्षांपूर्वी डोंबिवली ते ठाणे समांतर रस्त्याचा पर्याय तत्कालीन आमदार दिवंगत हरिश्चंद्र पाटील यांनी समोर आणला होता. विशेषतः 2005 मध्ये आलेल्या महापुरानंतर तर या रस्त्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली होती. या पार्श्वभूमीवर आज आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा या महत्त्वाच्या विषयाला चालना देण्याचे काम केले.

कारण सध्या लोकलवारी म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास असेच काहीसे समीकरण झाले असून सकाळी गेलेला मनुष्य पुन्हा घरी परतेल की नाही याची शाश्वती नसल्याच्या धक्कादायक प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहेत. अतिशय कमी वेळेत कल्याण डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे म्हणजेच लोकलशिवाय कोणताही पर्याय नसल्याने डोंबिवली ते ठाणे समांतर रस्ता हा काळाची गरज असल्याने या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे एक पाऊल पुढे पडले आहे ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील कामगार मागील १० वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्य टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना यावेळी दिले.

ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. तर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले.

यावेळी डोंबिवली शहर सचिव विधानसभाक्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उप तालुका प्रमुख राहुल गणपुले, उपशहरप्रमुख संजय विचारे, दत्ता वझे, गजानन मांगळूरकर उपस्थित होते

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा