Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान तर...

कल्याण डोंबिवलीसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी

मुंबई दि.15 डिसेंबर :
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या 29 महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे हा कार्यक्रम जाहीर केला. ज्यामध्ये सुमारे मुंबई, ठाणे, पुणेसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचाही समावेश आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी यावेळी केली.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी – 23 ते 30 डिसेंबर 2025

निवडणूक अर्ज छाननीसाठी – 31 डिसेंबर 2025

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी – 2 जानेवारी

निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी 2026

मतदान करण्यासाठी – 15 जानेवारी 2026

मतमोजणी करण्यासाठी – 16 जानेवारी 2026

अ वर्ग 15
ब वर्ग 13
क वर्ग
ड वर्ग

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा