Home बातम्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांचा कल्याण पश्चिमेतील सनराईज गॅलेक्सी सोसायटीतर्फे स्वागत...

नवनिर्वाचित भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांचा कल्याण पश्चिमेतील सनराईज गॅलेक्सी सोसायटीतर्फे स्वागत सोहळा

कल्याण दि.23 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित, नगरसेवक अमित महेश्वर धाक्रस यांचा कल्याण पश्चिमेतील सनराईस गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या वतीने भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. (Grand Felicitation of Newly Elected BJP Councillor Amit Dhakras by Sunrise Galaxy Society, Kalyan West)

या प्रसंगी बोलताना नगरसेवक अमितजी धाक्रस यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “मला आपण निवडून दिले आहे, याबद्दल मी आपला ऋणी आहे. प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. नागरिकांसाठी माझा भ्रमणध्वनी 24 तास उपलब्ध राहील, अशा शब्दांत नवनिर्वाचित नगरसेवक अमित धाक्रस यांनी भावना व्यक्त केल्या.

या स्वागत समारंभाच्या स्वागताध्यक्ष म्हणून ज्योतीताई अशोक सोलंकी, उपाध्यक्ष, महिला मोर्चा, जुनी कल्याण (प.) शहर, भाजप यांनी भूमिका पार पाडली. याच कार्यक्रमात ज्योतीताई सोलंकी यांची पुन्हा एकदा उपाध्यक्ष, महिला मोर्चा, जुनी कल्याण (प.) शहर, भाजप या पदावर नियुक्तीही करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतना भोईर, तृप्ती गायकवाड, ज्योती सोलंकी, शितल लोलेवार, शाहीद शेख, नयना आडके, रईस खान, शबनम शेख, बीना चावडा, मुन्नाफ शेख, गोरजा चांदणे, राधाताई, तेजल मेहता, संगीता म्हात्रे यांनी विशेष योगदान दिले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा