Home ठळक बातम्या ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही युद्धपातळीवर क्लस्टर योजना राबवा – आमदार राजेश मोरे...

ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतही युद्धपातळीवर क्लस्टर योजना राबवा – आमदार राजेश मोरे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

डोंबिवली दि.12 जून :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकारातून ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टर योजनेची कामे सुरू झाली आहेत. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही क्लस्टर योजनेची कामे तातडीने सुरू करून आरक्षित भूखडांचाही क्लस्टर योजनेत समावेश करण्याची मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार राजेश मोरे यांनी आज महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. (Implement cluster scheme on war footing in Kalyan Dombivali on the lines of Thane – MLA Rajesh More’s demand to KDMC Commissioner)

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून धोकादायक इमारती, चाळी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचा सुरक्षित निवारा देणे शक्य होऊ शकेल. यामुळे या योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान आयुक्त गोयल यांनी आमदारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत क्लस्टर योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तर यावेळी पालिकेच्या दहा प्रभागात प्रत्येकी एक क्लस्टरचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची सूचनाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त गोयल यांना केली.

याप्रसंगी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, शहरप्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेविका छाया वाघमारे, महिला संघटक विजया पोटे, तालुका प्रमुख महेश पाटील जी,माजी नगरसेवक गणेश जाधव, प्रशांत काळे, सुनील वायले उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा