
दुपारी 3.10 वाजता कल्याण डोंबिवलीमध्ये दुपारी 1.30 वाजेपर्यंत 29.48 टक्के मतदान… आतापर्यंत 4 लाख 5 हजारांहून अधिक मतदारांनी केले आहे मतदान…
दुपारी 12.30 वाजता: कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.53 टक्के मतदान… आतापर्यंत 2 लाख 30 हजारांहून अधिक मतदारांनी केले आहे मतदान…
सकाळी 10. वाजता : कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळच्या पहिल्या दोन तासांत 7.47 टक्के मतदान…सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंतची आकडेवारी… आतापर्यंत 1 लाखाहून अधिक मतदारांनी केले आहे मतदान…

सकाळी 8.15 मिनिटे : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार… केडीएमसीसह सर्व 29 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर होणार असल्याचा केला विश्वास…

सकाळी 7.55 मिनिटे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवा मतदारांची गर्दीही हळूहळू वाढताना दिसत आहे.
























