Home ठळक बातम्या सुधारणा उपक्रमात कोकण विभाग पहिला; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉ....

सुधारणा उपक्रमात कोकण विभाग पहिला; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सन्मानित

मुंबई दि.8 मे :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामकाजातील सुधारणांसाठी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमामध्ये कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग राज्यात प्रथम आला असून त्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात सत्तेवर येताच प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे, शासकीय सेवांचा दर्जा सुधारणे, जनतेच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे, या उद्देशाने महत्त्वाकांक्षी असा १०० दिवसांचा सुधारणा उपक्रम राबवला होता. प्रशासकीय कार्यालयांची कार्यक्षमता, सोयी सुविधा, तक्रार निवारण व्यवस्था अशा महत्वाच्या घटकांचे या सुधारणा उपक्रमात मूल्यमापन करण्यात आले.

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अत्याधुनिक तंत्राद्वारे प्रशासकीय कामात ‘एआय’चा प्रभावी वापर, सर्वसामान्यांशी निगडित पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यासोबतच शासकीय प्रक्रिया सुलभ करून अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली, कामकाजात पारदर्शकता वाढविण्यावर भर दिला, डिजिटलायझेशन करत शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. तसेच समुद्रकिनारी आणि नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या. ज्यामुळे कोकण विभागाने या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सुधारणा उपक्रमात राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवत डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आपली विजयी पताका फडकवली.

या कामगिरीबद्दल डॉ. विजय सूर्यवंशी यांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा