Home ठळक बातम्या महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचे काम; कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये मंगळवारी (13मे 2025) पाणीपुरवठा...

महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचे काम; कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये मंगळवारी (13मे 2025) पाणीपुरवठा बंद

कल्याण दि.9 मे :
महावितरणकडून २२ KV NRC-२ फिडर सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने परिणामी कल्याण डोंबिवलीतील या भागांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी 8 तास बंद राहणार आहे. (Maintenance and repair work by Mahavitaran; Water supply to these areas of Kalyan Dombivali will be stopped on Tuesday (13th May 2025))

महावितरणच्या या सबस्टेशनवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उंदचन केंद आणि १०० एमएलडी मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा केला जातो. महावितरणच्या या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याने नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा ८ तास कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागांमध्ये नसेल पाणी…
महापालिकेच्या क्षेत्रातील कल्याण ग्रामिण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिम विभागातील काही परिसर आणि डोंबिवली पूर्व तसेच डोंबिवली पश्चिम परिसराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा