Home कोरोना डोंबिवलीतील रुग्णाचा कोवीडमुळे मृत्यू ; ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू होते...

डोंबिवलीतील रुग्णाचा कोवीडमुळे मृत्यू ; ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू होते उपचार

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली माहिती

कल्याण डोंबिवली दि.28 मे :
कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतील एका 57 वर्षीय व्यक्तीचाही कोविडमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (Patient from Dombivli dies of COVID; Treatment begins at Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Thane)

दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका 47 वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीमधील एका 57 वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोविडमुळे मृत्यू झालेल्या या दोन्ही व्यक्तींना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहितीही केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे.

तर सध्या केडीएमसी क्षेत्रात कोविडचा एक रुग्ण असून सध्या तो होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा