
कल्याण दि.16 जून :
रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याणतर्फे के. एम. अग्रवाल कॉलेज, गांधारी, कल्याण पश्चिम येथे ‘व्हॉइस फॉर चॅरिटी ही संगीत गायन स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. गेल्या शनिवार आणि रविवार म्हणजेच 14-15 जून रोजी अग्रवाल महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातील स्पर्धक सहभागी झाले होते. (“Rotary Club of Central Kalyan’s ‘Voice for Charity’ music singing competition concludes with enthusiasm”)
ही स्पर्धा मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू आणि कॉर्निया शस्त्रक्रियांसाठी आवश्यक निधी संकलनासाठी आयोजित करण्यात आली होती. ईशा नेत्रालयाच्या सहकार्याने रोटरी क्लब गरजू आदिवासी भागांमध्ये गेली अनेक वर्षे आरोग्य सेवा पुरवत आहे. या स्पर्धेमुळे नवोदित गायकांना एक व्यासपीठ तर मिळालेच, शिवाय सामाजिक कार्यालाही बळकटी मिळाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. दिनेश मेहता, ज्योती मेहता आणि पु. डीजी रोटे. चंद्रहास शेट्टी उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह लखनऊ, वाराणसी, अहमदाबाद, भरूच, नाशिक, नागपूर अशा विविध भागांतील 101 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 18 ते 65 वयोगटातील पुरुष, महिला स्पर्धकांचा सहभाग उल्लेखनीय होता. ज्यामध्ये साताऱ्याच्या प्रसाद ओलांडे यांनी
प्रथम क्रमांक (₹25,000), कल्याणच्या काव्या पाला यांनी द्वितीय क्रमांक (₹20,000) आणि कल्याणच्या महेक शेखने तृतीय क्रमांक (₹15,000) पटकावला. तर उत्तेजनार्थ चार बक्षिसेही(₹5,000 x 2 आणि ₹3,000 x 2) वितरीत करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक आणि गायिका रूपाली मोघे, विनायक मालवणकर आणि विनायक करंदीकर यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेसिडेंट रोटे. संजय भोळे, अनंत देवरे, धनंजय पाटील, अनिल मोरे, भुवनेश्वर, नितीन पौडवाल, रवी कु-हाडे, डॉ. राजेंद्र वानखेडे, महिला प्रतिनिधी सुनीता नेमाडे, उज्वला भोळे, कल्पना पाटील, सौ. प्रीतम देवरे, श्रद्धा पौडवाल, डॉ. दिपाली तांबटकर आणि सर्व रोटेरियन्स यांनी मेहनत घेतली.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि संगीत संयोजन राजेश जंगम, प्रज्ञा संत यांनी केले.