Home ठळक बातम्या कल्याणातील नूतन विद्यालयातही धूमधडाक्यात साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव

कल्याणातील नूतन विद्यालयातही धूमधडाक्यात साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव

कल्याण दि.17 जून. :
कल्याण पश्चिमेतील अग्रेसर आणि नामांकित शाळा अशी ओळख असलेल्या कर्णिक रोड येथील नूतन विद्यालयातही शाळा प्रवेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. (School entrance ceremony celebrated with pomp and show in new school in Kalyan)

याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षणही केले. या कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक श्रीहरी पवळे सर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, अभ्यासक्रम आणि गुणवत्ता याविषयी मुख्याध्यापिका मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन करत सर्व शिक्षकांचा परिचयही विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.

याप्रसंगी शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सरस्वती पूजनाचा सन्मानही देण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नवीन शाळा, नवीन पुस्तकं, नवीन गणवेश अशा या सर्व नवीन वातावरणात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा केल्याची माहिती शुभांगी भोसले मॅडमनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा