Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही पारदर्शक कारभारासाठी येणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची – भाजप प्रदेशाध्यक्ष...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही पारदर्शक कारभारासाठी येणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

कल्याण पूर्वेच्या कार्यकर्ता मेळाव्यात करून दिली “शत प्रतिशत भाजपच्या” घोषणेची आठवण

कल्याण दि.23 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही पारदर्शक कारभार करून घेण्यासाठी येणारी निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेतील कार्यकर्ता मेळाव्यात रणशिंग फुंकले. तसेच पार्लमेंट टू पंचायत शत प्रतिशत भाजपच्या घोषणेची आठवणही चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी करून दिली. (The upcoming election is extremely important to ensure transparent governance in the Kalyan-Dombivli Municipal Corporation as well, said BJP State President Ravindra Chavan)

कल्याण पूर्वेतील 100 फुटी रस्ता परिसरात झालेल्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना रविंद्र चव्हाण यांनी निवडणुकीत भाजपलाच का निवडून द्यायचे याचे आवाहन करताना कल्याण पूर्वेतील नागरी समस्यांवरही यावेळी भाष्य केले.

कल्याण पूर्वेचा परिसर अतिशय दाटीवाटीच्या लोकवस्तीचा असून स्वतःचे हक्काचे निर्माण करणे हे त्यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून एसआरएसारख्या योजना आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच 24 तास पाणी पुरवठा, प्रशस्त रस्ते, प्रमुख रस्त्यांशी या भागाची जोडणी आदी महत्त्वाचे मुद्दे चव्हाण यांनी आपल्या भाषणात अधोरेखित करत या भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.

तर पार्लमेंट टू पंचायत या शत प्रतिशत भाजपच्या घोषणेचा जेव्हा आपण विचार करतो. त्यावेळेला केंद्र आणि राज्यातील सरकारचे चालणारा पारदर्शक कारभार. तो पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येही पारदर्शकपणे कारभार करून घेण्यासाठी 15 तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे असतील, त्यांच्याठिकाणी तुम्हाला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा