Home ठळक बातम्या ब्रँड, ब्रँड म्हणणाऱ्यांचा महापालिका निवडणुकीत बँड वाजणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ब्रँड, ब्रँड म्हणणाऱ्यांचा महापालिका निवडणुकीत बँड वाजणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवलीमध्ये झालेल्या विजय निर्धार सभेमध्ये नाव न घेता टीकास्त्र

डोंबिवली दि.26 डिसेंबर :
ब्रँड, ब्रँड म्हणणाऱ्यांचा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत बँड वाजणार असे सांगत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव – राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयावर टिका केली. डोंबिवलीत झालेल्या विजय निर्धार सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरले.( Those Talking Only About ‘Brand’ Will Face a Reality Check in the Municipal Elections” – Deputy Chief Minister Eknath Shinde)

लोकसभा निवडणुकीत भगवा फडकलाय, विधानसभा निवडणुकीत भगवा फडकलाय, नगरपरिषद निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही भगवाच फडकणार ही काळया दगडावरची रेघ असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर आम्ही बोलतो कमी आणि कामे जास्त करतो, ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आम्ही अंगिकारली आहे. तसेच श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यात डोंबिवलीकरांनी सिंहाचा वाटा उचलला असून त्यानेही या मतदारसंघात विकासाचा रतीब घातला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

तर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे, महायुतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आपली सुरू असणारी चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे कोण काय बोलतं, बाहेर काय चर्चा सुरू आहे तिकडे लक्ष देऊ नका अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना यावेळी आश्वस्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा