
मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात होणार तातडीचे दुरुस्ती काम
डोंबिवली दि.12 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने उद्या बुधवारी 13 ऑगस्ट 2025 रोजी डोंबिवलीचा पाणीपुरवठा 6 तास बंद राहणार आहे.
दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
या अतितातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामामुळे नेतीवली जलशुद्धिकरण केंद्रावरून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागाला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी नागरिकांनी पाणी जपून वापरून आणि पाणीसाठा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.