Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 7 तास...

येत्या मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 7 तास बंद

 

कल्याण डोंबिवली दि.4 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज.शु.के.) आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो.
टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील NRC-२ फीडरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी येत्या मंगळवारी 9 सप्टेंबर २०२५ रोजी कल्याण डोंबिवलीच्या पुढील भागांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. यादिवशी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून महापालिकेला पाणीपुरवठा करता येणार नाही. (Water supply to Kalyan Dombivli to be shut off for 7 hours on Tuesday, September 9, 2025)

परिणामी महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण विभागातील मांडा- टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आदी गावे यांसह डोंबिवलीच्या पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

तरी या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा