Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी-युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण पश्चिमेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी-युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

कल्याण दि.26 जून :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी हळूहळू वेग घेतल्याचे दिसत आहे. त्याच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांसह युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीही आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. (Uddhav Balasaheb Thackeray party office bearers from Kalyan West join Shiv Sena)

जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसतसे राजकीय वातावरणही तापू लागले असून राजकीय पक्षांच्या प्रवेशाने जोर धरला आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध महिला पदाधिकारी – कार्यकर्ते आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

ये तो अभी झांकी है – आमदार विश्वनाथ भोईर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन आज या सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे. निवडणुका आल्या म्हणून हे प्रवेश झालेले नसून आमच्या पक्षाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन हे पक्षप्रवेश सुरूच असल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली. तर येत्या काळात अनेक मोठमोठाले पक्षप्रवेश येत्या काळात होणार असल्याचे सूचक वक्तव्यही आमदार भोईर यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, महिला शहर संघटक नेत्रा उगले, युवासेनेचे सुजित डामरे, सुजित रोकडे, प्रतीक पेणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा