Home क्राइम वॉच कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून हरवलेले महागडे मोबाईल शोधून नागरिकांना परत

कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून हरवलेले महागडे मोबाईल शोधून नागरिकांना परत

कल्याण | १८ ऑक्टोबर
मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे ही नागरिकांसाठी चिंतेची बाब असते. मात्र, कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी अशा नागरिकांना दिलासा देत गहाळ आणि चोरीला गेलेले जवळपास ५० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. शोधण्यात आलेले हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून मोबाईल परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Kalyan’s Bazarpeth Police Recover Missing Expensive Mobile Phones and Return Them to Their Owners)

कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या उपस्थितीत मोबाईल संबंधित नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले.

मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच, मोबाईलचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाजारपेठ पोलिसांचे आभार मानले. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या नागरिकांना परत मिळवून देण्याच्या या प्रयत्नातून पोलिसांची तत्परता आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा