
कल्याण दि.2 मार्च :
मध्य पूर्वेतील अमेरिका – इजरायल – ईराणमधील युद्धामुळे दुबईत अडकून पडलेले कल्याण पश्चिमेतील 6 पर्यटक सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप मायदेशी आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Amid US–Israel–Iran Conflict, 6 Tourists from Kalyan Stranded in Abu Dhabi Return Safely to Mumbai)
कल्याण पश्चिमेतील सुप्रसिद्ध व्यावसायिक डी. बी. जाधव यांच्या कुटुंबातील सहा सदस्य २४ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. मात्र अमेरिका–इजरायल–ईराण यांच्यातील युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम दुबईपर्यंत पोहोचल्याने तेथेही हल्ले होत आहेत. अनेक भारतीय पर्यटकांप्रमाणेच जाधव कुटुंबातील हे 6 जणही अबुधाबीमध्ये अडकून पडल्याने इकडे कल्याणात त्यांच्या कुटुंबीयांचा अक्षरशः जीव टांगणीला लागला होता.
या परिस्थितीमुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अबू धाबी येथून सोडण्यात आलेल्या विशेष विमानाने या सहा जणांसह अडकलेले इतर पर्यटकही सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत.
























