Home ठळक बातम्या आई नेचर क्युअरचे संस्थापक-संचालक डॉ. हर्षल अशोक पवार आणि अंजली हर्षल पवार...

आई नेचर क्युअरचे संस्थापक-संचालक डॉ. हर्षल अशोक पवार आणि अंजली हर्षल पवार यांना ‘महा ॲक्यूपंक्चर रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

कल्याण | 26 जुलै :
कल्याण येथील प्रसिद्ध ॲक्यूपंक्चर -निसर्गोपचार तज्ज्ञ तसेच आई नेचर क्युअरचे संस्थापक-संचालक डॉ. हर्षल अशोक पवार आणि सौ. अंजली हर्षल पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महा ॲक्यूपंक्चर रत्न पुरस्कार २०२६’ मराठी चित्रपट अभिनेते डॉ. सुयोग गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (AAI Nature Cure Founders Dr. Harshal Ashok Pawar and Anjali Harshal Pawar Honoured with the ‘Maha Acupuncture Ratna Award 2026’)

ॲक्यूपंक्चर, निसर्गोपचार आणि समग्र आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA) यांच्या वतीने हा राज्यस्तरीय सन्मान १९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
आई नेचर क्युअरच्या माध्यमातून हर्षल पवार आणि अंजली पवार यांनी ॲक्यूपंक्चर, निसर्गोपचार आणि औषधरहित उपचारपद्धतीद्वारे अनेक रुग्णांना आरोग्यलाभ मिळवून दिला आहे. आरोग्य जनजागृती, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास महाराष्ट्रातील नामवंत ॲक्यूपंक्चर तज्ज्ञ, डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये मराठी चित्रपट अभिनेते सुयोग गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अल्पसंख्याक विभाग) प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, ॲड. दत्तात्रय जाधवर आणि ॲड. नागेश सोनुने यांचा समावेश होता. तसेच मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघूळदे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल विविध संस्था, सहकारी आणि नागरिकांनी डॉ. हर्षल पवार व अंजली पवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा