Home ठळक बातम्या “टंचाईच्या भितीपोटी गॅसचे बुकींग करू नका” ; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक...

“टंचाईच्या भितीपोटी गॅसचे बुकींग करू नका” ; ठाणे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर

ठाणे, दि.13 मार्च :
सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि घरगुती एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या शंका आणि अफवांना आळा घालण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने विशेष नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सुरू करण्यात आलेल्या या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत नागरिकांच्या तक्रारी, शंका आणि समस्यांचे निरसन करण्यात येणार आहे. (“Do Not Book LPG Cylinders Out of Fear of Shortage”; Thane District Administration Issues Helpline Numbers)

जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी टंचाईच्या भीतीमुळे अनावश्यकपणे गॅस सिलेंडरचे प्रि-बुकिंग करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिक, प्रसारमाध्यमे, गॅस ग्राहक तसेच लोकप्रतिनिधी यांना कोणतीही तक्रार किंवा माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

📞 भ्रमणध्वनी : ९३७२३३८८२७
☎️ दूरध्वनी : ०२२-२५३०१७४०

घरगुती गॅस वितरणासंदर्भातील कोणतीही समस्या, तक्रार किंवा शंका असल्यास नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा