Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेच्या वायले नगर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत; काहींना घेतला चावा

कल्याण पश्चिमेच्या वायले नगर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत; काहींना घेतला चावा

(Ai Generated image)

केडीएमसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

कल्याण | २४ जून :
कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील वृंदावन पाम, आरती नगरी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (Stray Dog Menace in Kalyan West’s Vayle Nagar Area; Several Residents Bitten)

स्थानिक नागरिक वैभव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृंदावन पाम, आरती नगर सोसायटी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे कुत्रे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर तसेच परिसरातील लहान मुलांवर हल्ला करत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक जण जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून चालणे धोकादायक बनले असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा