
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेश मोरे, ट्रॅफिक डीसीपी संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी
कल्याण | २८ जुलै :
कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या कल्याण-शिळ रोड, शिळफाटा, मुंब्रा-दहिसर आणि १४ गाव परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि ट्रॅफिक डीसीपी संजय शिरसाट यांच्याकडून सोमवारी पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे, अडथळे आणि त्यावरील अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Major Traffic Relief Plan for Kalyan–Shilphata Corridor: Road Widening, Pothole-Free Roads & Strict Action Against Illegal Parking and Wrong-Side Driving)
विविध विभागाचे अधिकारीही उपस्थित…
वाहतूक विभागाचे उपायुक्त (डीसीपी) संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पाहणी दौऱ्यात आयआरबी (IRB), एमएमआरडीए (MMRDA), एमएसआरडीसी (MSRDC), ठाणे महानगरपालिका (TMC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एमआयडीसी (MIDC) तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
कायमस्वरूपी उपाययोजनाबाबत विभागांना निर्देश…
या वेळी संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे ओळखण्यात आली. रस्त्यावरील ‘बॉटलनेक’ ठिकाणे दूर करण्यासाठी अपूर्ण रस्तारुंदीकरण तातडीने पूर्ण करणे, वाहतुकीची क्षमता वाढविणे आणि आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश आमदार राजेश मोरे यांच्याकडून देण्यात आले.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या उपाययोजना…
तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांची आरसीसी (RCC) आणि मॅस्टिक डांबर (Mastic Asphalt) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांकडून होणारी राँग साईड वाहतूक रोखण्यासाठी अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्याचे, वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या चौकांमध्ये नवीन सिग्नल यंत्रणा उभारण्याचे तसेच रस्ता दुभाजक तोडून तयार करण्यात आलेले अनधिकृत मार्ग बंद करण्याच्या स्पष्ट सूचनाही आमदार मोरे यांनी यावेळी दिल्या.
वाहतुकीला होणारे सर्व अडथळे हटवणार…
याशिवाय रस्त्यालगत गॅरेज, हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांकडून होणाऱ्या अनधिकृत वाहन पार्किंगवर कठोर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतुकीत अडथळा ठरणारे महावितरणचे वीज खांब आणि विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) यांचे स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
टप्प्याटप्प्याने कृती आराखडा (Action Plan) राबविण्याचे निश्चित…
वाहतुकीचा वेग वाढविणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित, सुलभ व वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने टप्प्याटप्प्याने कृती आराखडा (Action Plan) राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
या संयुक्त पाहणी दौऱ्यास आयआरबीचे जनरल मॅनेजर महेश जोशी, सेक्रेटरी इंचार्ज सचिन दवे, एमएसआरडीसीचे अनिल शर्मा, ठाणे महानगरपालिकेचे सचिन कदम, आदित्य डावखर, कार्यकारी अभियंता अर्जुन अव्हाड, एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता एन. एस. नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद चव्हाण, टीएमसीचे सचिन भालेराव तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी बाबाजी पाटील, गणेश जयपाल, भरत भोईर, मुकेश पाटील, नकुल गायकर, गणेश मुंडे आणि संतोष वालीलकर उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
यावेळी वाहतूक कोंडी हा केवळ प्रवासाचा प्रश्न नसून नागरिकांचा वेळ, इंधन, आर्थिक संसाधने आणि आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी नमूद केले. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच भविष्यातील वाहतुकीचा विचार करून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला.
नागरिकांना वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

























धन्यवाद श्री मोरे जी, आपण जातीने ह्यात लक्ष देत आहात.
आशा करतो की ह्या वेळी कायम स्वरुपी तोडगा निघेल. रोज २-२ तास प्रवास एक बाजूने तोहि फक्त १८ किलोमीटर साठी. मनुष्य तास, इंधन वाया जात आहे. मानसिक त्रास ही होतो. एखादी ॲम्ब्युलन्स अडकून पडते त्या वेळी आजारी माणसांच्या नातेवाईकांची काय हलत होत असेल.
कृपया कायम स्वरुपी मार्ग काढा.
पालावा चा अर्धवट flyover आधी पूर्ण करा. शिळफाट्याच्या flyover चे व underpass चे काम युद्धपातळीवर हातात घ्या. तरच वाहतूक कोंडी कमी होईल. बाकीचे थातूरमातूर उपाय करून काहीही उपयोग नाही.
सर नमस्कार
माझ्या सारखे अनेक लोक उदरनिर्वाह करण्यासाठी कल्याण ते महापे, तुर्भे, वाशी आणि रबाळे एम आय डीसी मधे अनेक वर्षे कामाला जातात. ट्राफिक चे नियोजन प्रॉपर नसल्याने खुप ट्रॅफिक होत असते रोज 9.00 am ड्युटीला पोहचू शकत नाही त्यामुळे कंपनीत लेट मार्क लागला जातो. त्याचे पैसे कापले जातात. त्यामुळे पगार कमी येतो आणि महिन्याचे बजेट विस्कळीत होते. केडीयमटी बसेस कमी प्रमाणात आहेत त्यामुळे दोन बसेसची पब्लिक एका बस मध्ये भरली जातात. या गोष्टींचा नाहक त्रास होऊन आजारपणाला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टीवर तोडगा निघाल्यास आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानू. धन्यवाद सर एक रोज प्रवास करणारा प्रवासी
Taloja – Shilphata road chya donhi baajula illegal shops ahet.
Disat nahi ka prashaasanalaa ??
Tyavar actions kadhi honaar ??? Tyanna fukat ghar dilyaavar???
One flyover at Kalyan phata junction will immediately resolve the major traffic jam
काही होणार नाही सामान्य नागरिक चा त्रास कोणाला ही समजणार नाही नेते लोकाना पैसा कसा खाण्याचा तेव्हढे समजते palavacha bridge किती वर्ष jaley bandhtayat येवढ्या आता पडेल. कोणाला काही पडले नाही कुठे 2 लेन आहेत कुठे 3 लेन ट्रॅफिक पोलिस फक्त पैसा खाण्यात मस्त आहेत.