Home ठळक बातम्या मनसेच्या कल्याण शहर विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी अंकुश राजपूत यांची नियुक्ती

मनसेच्या कल्याण शहर विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी अंकुश राजपूत यांची नियुक्ती

कल्याण | ३० जुलै :
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कल्याण शहराध्यक्षपदी अंकुश राजपूतयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Ankush Rajput Appointed as Kalyan City President of MNS Students’ Wing)

गेल्या १६ वर्षांपासून अंकुश राजपूत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय असून पक्षाच्या विविध आंदोलने, संघटनात्मक उपक्रम आणि समाजहिताच्या कार्यात त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला आहे. कार्यकर्ता म्हणून सुरुवात करत त्यांनी शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करत संघटना बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविणे, विद्यार्थी संघटना मजबूत करणे, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे आणि समाजाभिमुख उपक्रम राबविणे या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत ही जबाबदारी दिली आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अंकुश राजपूत यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. “हे केवळ पद नसून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची मोठी जबाबदारी आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे,”असे त्यांनी सांगितले.

तसेच,”राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा