Home ठळक बातम्या डोंबिवली पूर्वेचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी १६ तास बंद; नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य...

डोंबिवली पूर्वेचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी १६ तास बंद; नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम

डोंबिवली | ३० ऑक्टोबर २०२६
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नेतिवली येथील १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातून डोंबिवली पूर्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर परिवहन डेपोच्या बाजूला होत असलेली पाणीगळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Dombivli East to Face 16-Hour Water Cut This Tuesday; KDMC to Undertake Leakage Repair Work on Main Pipeline at Netivali Water Treatment Plant)

या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या मंगळवारी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत (एकूण १६ तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि या काळात पाणी जपून वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा