Home ठळक बातम्या कल्याणातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तीमत्व डॉ. सुरेश एकलहरे यांचे निधन

कल्याणातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तीमत्व डॉ. सुरेश एकलहरे यांचे निधन

कल्याण, दि. १८ ऑक्टोबर :
कल्याण शहरातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तीमत्व आणि समाजाभिमुख डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ. सुरेश एकलहरे यांचे शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (Senior social personality from Kalyan, Dr. Suresh Ekalhare passes away)

डॉ. एकलहरे यांनी अनेक वर्षे कल्याण शहरात रुग्णसेवा, गरीब आणि वंचित घटकांच्या आरोग्यसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण केले. केवळ वैद्यक म्हणून नव्हे तर सामाजिक जाण असलेले कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. ते कल्याणमधील शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण संस्था, याज्ञवल्क्य संस्था, सोशल सर्व्हिस लीग, कल्याण संस्कृती मंच, सदिच्छा अपंग पुनर्वसन केंद्र, डॉ. आनंदीबाई जोशी लोक विद्यालय आणि बालकल्याण संस्था अशा विविध संस्थांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.

सामाजिक कार्यातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल *सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा* समितीकडून त्यांना “मानाचा शताब्दी पुरस्कार”ही देण्यात आला होता. त्यांच्या साधेपणामुळे आणि लोकाभिमुख स्वभावामुळे कल्याणकारांच्या मनामध्ये त्यांचे आदराचे स्थान होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार असून, एकलहरे यांच्या निधनाने कल्याण शहरातील सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्राने एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा