Home ठळक बातम्या ‘आयसीएआय’ (ICAi) कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे यांची निवड

‘आयसीएआय’ (ICAi) कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे यांची निवड

कल्याण/डोंबिवली दि.23 जानेवारी :
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या कल्याण-डोंबिवली शाखा (WIRC) च्या वर्ष २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. (CA Amit Mohare Elected as Chairman of ICAI Kalyan-Dombivli Branch)

नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
अध्यक्ष: सीए अमित मोहरे
उपाध्यक्ष: सीए प्रदीप मेहता
सचिव: सीए अमृता जोशी
कोषाध्यक्ष: सीए ईश्वर रोहरा
विकास अध्यक्ष (WICASA): सीए रोहन पाठक
माजी अध्यक्ष: सीए राकेश अग्रवाल
कार्यकारिणी सदस्य: सीए गिरीश तारवानी, सीए अनुराग गुप्ता आणि सीए विपुल शाह.

कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे असून यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, तसेच कर्जत आणि कसारा या भागांचा समावेश होतो. सध्या या शाखेशी ४ हजार ८०० हून अधिक सीए सभासद आणि १३, हजारांहून हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत.

सध्या ही शाखा ५ अभ्यासिका (Libraries) आणि २ आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, सभासद आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सहकार्याने कल्याण पश्चिमेत संस्थेची स्वतःची सुसज्ज इमारत लवकरच उभी राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली.

व्यावसायिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत ही शाखा येणाऱ्या काळात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा