Home ठळक बातम्या शहापूरमध्ये उभं राहिलंय ठाणे जिल्ह्यातील पहिलं अत्याधुनिक प्लॅनेटोरियम ; 5 एप्रिलला होणार...

शहापूरमध्ये उभं राहिलंय ठाणे जिल्ह्यातील पहिलं अत्याधुनिक प्लॅनेटोरियम ; 5 एप्रिलला होणार उद्घाटन

शहापूर दि.1 एप्रिल :
ठाणे जिल्ह्यात विज्ञान आणि खगोल अभ्यासाला चालना देणारी एक महत्त्वाची पायरी गाठण्यात आली असून, शहापूर येथे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण (Planetarium) आणि वेधशाळा (Astronomical Observatory) उभारण्यात आली आहे. (A New Chapter in Thane’s History: District’s First State-of-the-Art Planetarium Rises in Shahapur)

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी साकारला असून खगोलशास्त्राविषयी जनजागृती आणि आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने साडेतीन एकर परिसरात हा उपक्रम उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते होणार आहे.

🔭 अत्याधुनिक सुविधा आणि वैशिष्ट्ये
शहापूर येथील साकडभाव परिसरात, पोकलेवाडी जवळ जुनोनी-कोथरा रोडवर उभारलेल्या या प्रकल्पामध्ये खगोलप्रेमींसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

🎥 56 आसनक्षमतेचे आधुनिक तारांगण…
🌌 मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत 30 ते 60 मिनिटांचे खगोलशास्त्रीय शो…
🔭 16, 14, 10 आणि 6 इंच व्यासाच्या आरशाच्या चार शक्तिशाली दुर्बिणी…
☀️ सोलर फिल्टरद्वारे दिवसा सूर्य निरीक्षणाची सुविधा…
🖥️ संगणकाशी जोडलेल्या दुर्बिणीतून छायाचित्रण व प्रोजेक्शनची सोय…
🏗️ स्वयंचलित छप्पर (एक बटणावर उघडणारी वेधशाळा)…

🌠 अद्वितीय खगोल अनुभव
या वेधशाळेतून गुरू ग्रहाचे उपग्रह, त्यावरील पट्टे, शनी ग्रहाची वलये तसेच विविध दीर्घिका स्पष्टपणे पाहता येतात. खगोलप्रेमींना रात्रभर आकाश निरीक्षणाचा अनुभव घेण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

🏕️ पर्यटकांसाठी विशेष सुविधा
या प्रकल्पामध्ये केवळ खगोल अभ्यासच नव्हे तर पर्यटकांसाठीही उत्तम सुविधा उपलब्ध आहेत:

🛏️ राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि डॉर्मिटरी
🏛️ प्रदर्शन हॉल आणि सेल्फ-पॉइंट्स
👨‍🏫 मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक
🍽️ भोजन व कॅन्टीन सुविधा


📍 या प्रकल्पास भेट देण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 7506266266 / 7506322322

ठाकूर बंधूंनी उभारलेले हे तारांगण ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणार असून विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी एक नवे आकर्षणकेंद्र ठरणार असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा