Home ठळक बातम्या पावसाळा लांबण्याची शक्यता; कल्याण-डोंबिवलीत १२ जूनपासून टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद

पावसाळा लांबण्याची शक्यता; कल्याण-डोंबिवलीत १२ जूनपासून टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद

कल्याण डोंबिवली | ११ जून :
यंदाच्या वर्षी अल निनो (El Niño) आणि आयओडी (Indian Ocean Dipole) यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजनासाठी दररोज २० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. (Delayed Monsoon Likely; 24-Hour Water Supply Shutdowns to Begin in Phases Across Kalyan-Dombivli from June 12)

याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही शहरातील बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ जूनपासून बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून पाणीपुरवठा होणाऱ्या प्रभाग क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता ही उपाययोजना आवश्यक ठरली आहे. भविष्यात शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रभागक्षेत्रांमध्ये अशाप्रकारे बंद असणार पाणी पुरवठा…
अ.क्र.

1.
*नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र*

12 जून 2026 आणि 17 जून 2026
डोंबिवली (पूर्व ) येथील “ फ” व “ग “ प्रभाग क्षेत्र.

2.
*बारावे जलशुद्धीकरण केंद्र*

13 जून 2026 आणि 18 जून 2026
कल्याण (पूर्व) येथील “ड “ व “जे” प्रभाग क्षेत्र, कल्याण (पश्चिम) येथील गोदरेज हिल व “क”प्रभाग क्षेत्रातील पार नाका, सुभाष मैदान टाकी परिसर.

३.
*नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र*

14 जून 2026 आणि 19 जून 2026
डोंबिवली (पश्चिम ) येथील “ ह” प्रभाग क्षेत्र.

4.
*बारावे जलशुद्धीकरण केंद्र*

15 जून 2026 आणि 20 जून 2026.
कल्याण (पश्चिम) येथील “ ब” व “क” प्रभाग क्षेत्र.

5.
*मोहिली जलशुद्धीकरण केंद्र*

16 जून 2026 आणि 21 जून 2026
मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) तसेच “ब” प्रभाग क्षेत्रातील योगिधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज, चिकनघर, मुरबाड रोड परिसर, तसेच “ड” प्रभाग क्षेत्रातील वालधुनी परिसर इ.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा