Home ठळक बातम्या कल्याण जनता सहकारी बँकेचा कार-बाईक महोत्सव; दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षक व्याजदर आणि शून्य...

कल्याण जनता सहकारी बँकेचा कार-बाईक महोत्सव; दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षक व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्काची संधी

कल्याण | १७ ऑक्टोबर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे आजपासून दोन दिवसीय कार-बाईक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेच्या मोहिंदर सिंग काबुल सिंग हायस्कूल रोडवरील रामा परदेशी मैदानात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते आणि बँकेच्या अध्यक्ष ॲड. संपदा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी, उपाध्यक्ष महेश देशपांडे, संचालक डॉ. चंद्रशेखर तांबडे, डॉ. अस्मिता मोडक, बिपीनचंद्र वाडेकर, लेले, गमरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. (Kalyan Janata Sahakari Bank’s Car-Bike Festival: Attractive Interest Rates and Zero Processing Fees for Customers This Diwali!)

‘ड्राईव्ह युअर ड्रीम’ संकल्पनेतून ग्राहकांना आर्थिक दिलासा…
‘ड्राईव्ह युअर ड्रीम – सपने आपके, सहयोग हमारा’ या ब्रीदवाक्यांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात वाहन खरेदीदारांसाठी विशेष आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क तसेच ज्वलंत ग्राहक गरजांना अनुरूप वाहन कर्ज सुविधांचा समावेश आहे. विशेषतः १०० टक्के अर्थसाहाय्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याने ग्राहकांना वाहन खरेदीचा निर्णय घेणे अधिक सोयीचे ठरणार असल्याची माहिती बँक व्यवस्थापनातर्फे देण्यात आली. या महोत्सवात कार आणि बाईक विक्री करणाऱ्या अनेक नामांकित कंपन्यांच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आज पहिल्याच दिवशी या महोत्सवात अनेक इच्छुक ग्राहकांनी आपापल्या गाड्याही बुक केल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.

या महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत वाहन कर्जाच्या सुविधा पोहोचविण्याचा जनता सहकारी बँकेचा प्रयत्न आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या पसंतीचे वाहन खरेदी करण्यासाठी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी बँकेचे उपसरव्यवस्थापक सुनील भोईर यांच्याशी (९३२१५३६५७५) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा