
डोंबिवली | २२ जून :
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने आशुतोष सिंह यांची भाजप कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडून नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. (Ashutosh Singh Appointed BJP Kalyan District Secretary; Appointment Letter Presented by District President Nandu Parab)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच ठाणे जिल्हा विभागीय प्रसिद्धी प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे आशुतोष सिंह यांनी नमूद केले.

या नियुक्तीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानत आगामी काळात पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आशुतोष सिंह यांच्या नियुक्तीचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

























