Site icon LNN

भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कल्याणच्या भावार्थ भागवत दौंड यांची नियुक्ती

कल्याण | ६ ऑक्टोबर :

भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कल्याणच्या भावार्थ भागवत दौंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी  सुनील राणे आणि भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भावार्थ भागवत दौंड यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. (BJP Yuva Morcha Maharashtra State Vice-President Appointment,Kalyan’s Bhavarth Bhagwat Daund Appointed BJP Yuva Morcha Maharashtra State Vice-President)

भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रसार, युवा नेतृत्वाची जडणघडण, युवकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणे, या उद्दिष्टांसाठी भावार्थ दौंड विशेष प्रयत्न करतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या नियुक्तीमुळे भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल आणि महाराष्ट्रातील युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षाही वरिष्ठांकडून व्यक्त केली जात आहे.

तर पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या या विश्वासाबद्दल भावार्थ दौंड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले असून पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, समर्पणाने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच पक्षाने सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना संघटित करणे, युवकांमध्ये राष्ट्रहिताची भावना रुजविणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ युवकांपर्यंत पोहोचविणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी आपण कार्यरत राहू असे भावार्थ दौंड यांनी सांगितले आहे.

Exit mobile version